शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ जानेवारी) :- देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनिकेत काटे, स्विकृत सदस्य, पिं चिं मनपा यांनी सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे ज्येष्ठ नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी शुगर,हृदय, रक्तदाब तसेच डोळे तपासणी अशा विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठांनी शिबिराला मोठी हजेरी लावली व उपयुक्त अशा तपासणी करून घेतल्या.
या शिबिराची सुरुवात भोसरी पोलीस स्टेशनचे नितीन मायप्पा लांडगे साहेब , नगरसेवक राजाभाऊ बनसोडे ,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत मोरे , ज्येष्ठ मार्गदर्शक सोपाननाना भाडाळे यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी प्रमुख उपस्थितीत चंद्रकांतकाका वाखारे , आबा कणसे, सुनीलभाऊ मोरे, चंद्रकांत काटे पोलीस पाटील,चंद्रकांत उर्फ पप्पा बाराथे, सुरेश तात्या काटे, यशवंत बोधे, भरतभाऊ काटे, विजुभाऊ किंडरे, सुरेशभाऊ किंडरे, कैलासभाऊ कंधारे,कविवर्य शहा साहेब,सोपानराव काटे, मुरली आण्णा काटे,गजानन काटे यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिराचे आयोजन दीपक भाऊ काटे, नितीन बोधे , आशिष काटे,शैलेश गाडूते, प्रदीप पोतदार, कुमार मते तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटलचे आदरणीय डॉ.अंजुम गवंडी आणि त्यांचा सर्व स्टाफ यांनी केले होते.