शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ जानेवारी) :- पिंपरी चिंचवड थेरगाव माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक बन्सी आठवे सर यांना “क्रीडा शिक्षक पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार हा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशन यांच्यावतीने देण्यात येणार आहे.
तसेच खासदार बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्तिमत्व आणि आदर्श संस्थांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम दि. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी साडेचार वाजता प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे संपन्न होणार आहे.
Advertisement