सौ.साधना नेताजी काशीद यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
शबनम न्यूज ( पिंपरी चिंचवड ) –
पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे नेताजी काशीद यांच्या सौभाग्यवती सौ साधना नेताजी काशीद यांच्या वतीने नुकताच हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात म्हेत्रे वस्ती , ताम्हाणे वस्ती या परिसरात संपन्न झाला. या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
सौ साधना नेताजी काशीद यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमांमध्ये हळदीकुंकवाच्या निमित्ताने महिलांना एकत्र आणणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे त्यांच्या अडचणी जाणून घेणे या स्वरूपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्ताने अनेक महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
मागील कोरोना काळात दोन वर्षापासून असे कार्यक्रम करण्यास निर्बंध लादण्यात आले होते, दोन वर्षानंतर या महिला एकत्र आल्याने त्यांनी आनंदाने हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला , महिलांचे संघटन करणे हा उद्देश असून या संघटनात्मक महिलांचे सक्षमीकरण करणे हा आपला मुख्य उद्देश असल्याचे यावेळी साधना नेताजी काशीद यांनी या निमित्ताने सांगितले.
ह.भ.प.विष्णु महाराज पोळ या भजनी मंडळाला पेटी सप्रेम भेट
तसेच या निमित्ताने नेताजी काशीद यांच्या वतीने ह.भ.प.विष्णु महाराज पोळ या भजनी मंडळाला पेटी सप्रेम भेट देण्यात आली या वेळी नेताजी काशीद यांचे सहकारी, मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.