पुणे ;
आपल्या पतीसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी पत्नी दौंड तालुक्यातील यवत येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली होती. पती हॉटेलमध्ये विचारपूस करण्यासाठी गेला असता, विवाहिता बाहेर उभी होती. यावेळी आरोपींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेला तिच्या भावाचा अपघात झाला आहे, असे खोटे सांगितले.
महिलेला फसवून तिला दुचाकीवर बसवून सात किलोमीटर अंतरावर नेले. त्यानंतर एका मोकळ्या जागेत तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. शनिवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे , याबाबत महिलेने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तिच्या फिर्यादीवरुन यवत पोलिसांनी पाच जण ताब्यात घेऊन अधिक तपास सुरु केला आहे
या प्रकरणातील पाच आरोपींना 24 तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले आहे. यवत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईनंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ही घटना घडली होती..