शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.३१ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील मौजे थेरगाव येथील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टी परिसरात नामे माहिती फलक लावण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मौजे थेरगाव डांगे चौक येथे महानगरपालिके मार्फत अत्यंत अभिमानास्पद असे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी उभारली असून शिकांतिकेची बाबही आहे की, शिवसृष्टी परिसरात एकही नामे माहिती फलक उपलब्ध नसल्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात नाराजी असून महापालिकेमार्फत तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टी परिसरात नामे माहिती फलक लावण्या बाबत संबंधितांना आदेश द्यावेत, असे सदर निवेदनात नगरसेविका मनीषा पवार यांनी नमूद केले आहे.