शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०२ फेब्रुवारी) :- पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर झाली असून,प्रभाग क्रमांक १२ साठी समाविष्ट क्षेत्राचा विचार करता,आपला विजय १००% सुनिश्चित आहे.समर्थक आणि कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे आणि नागरिकांना आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा देऊन,कायम जनतेच्या सेवेत असलेल्या लोकप्रतिनिधीला मनपात संधी देण्यासाठी जीवाचे रान करावे असे आवाहन मनपा स्वीकृत प्रभाग सदस्य दिनेश यादव यांनी केले आहे.
आपल्याला अपेक्षित होती अगदी तशीच प्रभागरचना झालेली आहे आणि त्यामुळे आता दिनेश यादव यांना मनपात नगरसेवक म्हणून संधी देण्यासाठी कार्यकर्ते आणि समर्थक यांनी प्रभागरचना जाहीर झाल्यावर दिनेश यादव यांची भेट घेत पाठींबा जाहीर करणे सुरू केले आहे.मंगळवारी(ता.१)जशी प्रभागरचना जाहीर झाली,तशी यादव समर्थकांची गर्दी त्यांचे घरी आणि कार्यालय इथे सुरू झाली आहे,यावेळी चर्चा करताना यादव यांनी त्यांना पुढील काळात नागरिकांपर्यंत पोहोचणेसाठी कामाला लागा,अशा सूचना दिल्या आहेत.आपण कायम जनसंपर्क ठेवून असल्याने,नागरिकांचा पूर्ण विश्वास आपण केलेल्या कार्यावर आहे आणि म्हणून सदैव जनतेच्या हितासाठी झटणारा नेता,म्हणून दिनेश यादव यांची जनसामान्य माणसात असलेली प्रतिमा त्यांना निवडणुकांत यश मिळवून देईल असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. आमदार महेश लांडगे यांनी दिनेश यादव यांच्यावर कायम मायेचा आणि विश्वासाचा हात ठेवलेला आहे आणि त्याला आजपर्यंत यादव यांनी तडा जाऊ न देता,सामान्य जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.त्यामुळे २०२२ साठी दिनेश यादव यांना निवडून द्यायला जनतेने स्वतःच पुढाकार घेतल्याचे चित्र प्रभागात पुढील काळात दिसणार असून,यादव यांचा विजय काळ्या दगडावरची रेष ठरेल असा सूर या भागात आहे.