सरकारकडून वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता
शबनम न्यूज : बारामती (दि.०२ फेब्रुवारी) :- राज्य सरकारने नुकतेच वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. मात्र, आता सरकारकडून वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता आहे. याबाबत एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाईनबाबतच्या निर्णयावर भाष्य केले. जर अनेक स्तरातून विरोध होत असेल, तर ते थांबवलं तरी काही परिणाम होणार नाही आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला, तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही, असे मत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे ठाकरे सरकार सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय मागे घेईल? अशी चर्चा सुरू आहे.
तसेच वाईन आणि इतरांमधला फरक आपण जाणून घेतला पाहिजे.लोकांचा विरोध होत असताना सरकारने वेगळा विचार करावा असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.