शबनम न्यूज : मुंबई (दि.०२ फेब्रुवारी) :- अभिनेते रमेश देव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. चारच दिवसांपूर्वी ३० जानेवारी रोजी त्यांनी आपला ९३वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
‘आनंद’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. 1956 साली रमेश देव यांनी आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तर आरती हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता. रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी पैशाचा पाऊस आणि भाग्यलक्ष्मी या चित्रपटांत काम केले.