शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ फेब्रुवारी) :- आज मा.महसूल मंत्री एकनाथ खडसे हे पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी पिंपळे सौदागर येथे मा. विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते एकनाथ खडसे यांचा शाल, श्रीफळ आणि श्री. पांडुरंगाची मुर्ती भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते मा नगरसेवक शंकर काटे ,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी प्रशांत सपकाळ, लेवा पाटील समाज पिंपळे सौदागरचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे,ज्येष्ठ नागरिक संघाचे भागवत झोपे ,निर्मल गाजरे,कृष्णाजी खडसे, संदिप भोळे, तेजस वाघुळदे,गायत्री तेजस वाघुळदे आदि उपस्थित होते.
Advertisement
Advertisement