शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ फेब्रुवारी) :- दरवर्षी शिवजयंती निमित्त शिवरायांना मानवंदना देऊन पेटती मशाल मुले किंवा पुरुषमंडळी घेऊन येतात, असे आपण पाहत आलोय परंतु यावर्षी कराटे टीम, USKA (मोरेवस्ती कराटे शाखा) कराटे क्लास च्या मुली मशाल घेऊन येणार आहेत म्हणून त्याची पूर्व तयारी,रंगीत तालीम केली.शिवरायांना मानवंदना देणार आहेत त्याची पूर्वतयारी या कराटे क्लास च्या मुलींनी केली असून त्याची रंगीत तालीम हि पूर्ण केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २९.०१.२२ रोजी , USKA (मोरेवस्ती कराटे शाखा) मधील ८ मुलींनी एकत्र येऊन वृदुला पवार , श्वेता लिमन,भक्ती दहिफळे, सानिका माने,मधुरी पाटील,नेत्रा ढगे,श्रावणी पाटील,दीप्ती पाटील, या सर्व मुलींनी रात्री १२:१५ वाजता १०°© तापमान असताना तिकोना किल्ला येथुन् bird valley गार्डन पर्यंत ४४ किलोमीटर धावण्याचा सराव केला, आणि हा अवघड प्रवास त्या संपूर्ण टीम ने यशस्वी पणे पूर्ण केला.
छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊमासाहेब यांना मानवंदना देण्यासाठी शिवजयंती च्या दिवशी ही संपूर्ण टीम तिकोना किल्ल्यावरून रात्री मशाल हाती घेऊन शिवनंदा,ओम साई सोसायटी,मोरेवस्ती पर्यंत चा हा प्रवास पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे,त्याचीच ही पूर्व तयारी त्यांनी आज यशस्वीपणे नियोजित् वेळेत पार पाडली.तर सरावाचा उद्देश्य फक्त एवढाच होता की कराटेच्या मुली देखील हे करू शकतात्, तर प्रत्येक मुलगी का करू शकत नाही हा आपल्या समजात् एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. जर त्यांना त्यांच्या पालकांनी स्पोर्ट्स साठी सपोर्ट केला तर. नक्की च हे शक्य होऊ शकते.
या उपक्रमात योगेश ढगे, गुणवंत इंगळे, नर्मदा दहिफळे, कल्पेश धानोकर, रविंद्र पवार आणि सोनाली पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.