शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ करिश्मा सनी बारणे यांचा वाढदिवस हळदी कुंकू चा कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. तसेच यानिमित्ताने थेरगाव मधील सर्व महिला बचत गटांना मोफत जमाखर्च पुस्तिका वाटप करण्यात आली. हा कार्यक्रम बुधवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी थेरगाव येथील संचेती शाळे शेजारी पारनेरकर महाराज मंदिरात संपन्न झाला.
या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक महिला एकत्र आल्या. थेरगाव परिसरातील अनेक महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी केला. हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश सौ. करिश्माताई यांनी बोलून दाखविला. यानिमित्ताने अनेक महिलांना एकत्रित आणून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तसेच या महिलांचे संघटन करून त्यांचे सक्षमीकरण करणे व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी योग्य शासकीय माहिती त्यांना देणे तसेच महिला या व्यावसायिक रित्या सक्षम व्हाव्यात तसेच महिला बचत गटांना वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन महिला बचत गटांच्या माध्यमातून व्यवसायिक महिलांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता या वाढदिवसाच्या निमित्ताने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. व या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे निमित्ताने अनेक महिलांना एकत्रित आणून महिला सक्षमीकरणाचा राबविण्यात आल्या असल्याचे यावेळी करिश्मा सनी बारणे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे निमित्ताने या परिसरातील नगरसेवक अभिषेक बारणे, काळू राम बारणे, नगरसेविका झामा ताई बारणे, नगरसेविका मनिषा पवार, युवानेते सनी बारणे, थेरगाव परिसरातील सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या. या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात एकूण 400 महिलांनी सहभाग घेतला व आनंदाने हा कार्यक्रम साजरा केला.