शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ फेब्रुवारी) :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत आज गुरुवारी (दि.३) सकाळी क क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,सहाय्यक आरोग्य अधिकारी बी बी कांबळे व आरोग्य निरीक्षक वैभव केंचनगौडार चिखली परिसरात पाहणी करताना S S डायग्नोसिस पॅथॉलॉजी चे बायोमेडिकल वेस्ट उघडयावर टाकताना आढळल्याने त्यावर पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.
नागरिकांनी ओला, सुका व घातक कचरा वेगळा देण्याबाबत महानगपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.तसेच वैद्यकीय घातक कचरा योग्य पदधतीने विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असतानाही या लाबोरोटरी ने त्याचे पालन केले नसल्याने व घातक वैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकल्याने पॅथॉलॉजी वर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
Advertisement