शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील माध्यमिक विद्यालय थेरगाव शाळेत वय वर्षं 15 पुढील ९० विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहेत. तसेच थेरगाव रूग्णालय थेरगाव मार्फत इयत्ता नववी आणि दहावीतील १५ ते १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना आयोजित करण्यात आलेल्या कोवॅक्सीन लसीकरण मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळाला. तीन तासांतच 90 विद्यार्थ्यांना लसीकरण यशस्वी करण्यात आले अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम यांनी दिली आहे.
नवीन थेरगाव रूग्णालयातील जेष्ठ वैद्यकीय अधिकारी श्री. डॉ.अभय दादेवार यांच्या वतीने हा लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला. तसेच डाॅ.प्राजक्ता वावरकर व सहकारी वर्गांचे तसेच ज्येष्ठ सिस्टर श्रीम.मेरगेवार यांचे मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम यांनी आभार व्यक्त केले आहे.
Advertisement