शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील शेत मजुर वर्ग, घरकाम करणार्या महिला, सफाई कामगार, वॉचमन, प्लंबर, रिक्षाचालक, डिलिव्हरी बॉय, पथारी वाले, फेरीवाले, खाजगी कार्यालयातील कर्मचारी आदी नागरिकांकरिता त्यांचा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास सरकारी योजनेच्या माध्यमातून रु. २ लाख पर्यंत चा विमा संरक्षण मिळावे, यासाठीही श्रम कार्ड आवश्यक असते. सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी नागरिकांनाही श्रम कार्ड मिळावे, याकरिता भोसरी येथील कविताताई भोंगाळे यांच्या कविता युवा मंचच्या वतीने गुरुवार दि. ३ फेब्रुवारी रोजी विदर्भ मित्र मंडळ भोसरी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मोफत श्रम कार्ड नोंदणी व वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये अनेक नागरिकांना ई श्रम कार्ड वितरित करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहावयास मिळाला.या ई श्रमिक कार्ड नोंदणी व वितरण शिबिरांमध्ये अनेक नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. शासनाचे योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या शिबिरात मार्फत करण्यात येत असल्याचे यावेळी मंचच्या संस्थापक अध्यक्ष सौ कविताताई भोंगाळे यांनी सांगितले. आपण आपल्या प्रभागात नागरिकांना विविध सोयी सुविधा मिळविण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना दोन लाखापर्यंतचा आरोग्य विमा मिळणार आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचेही यावेळी कविताताई भोंगाळे यांनी सांगितले.