शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे युवा नेते एजाज चौधरी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत अध्यक्ष आणि युवक एनसीपी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज भैया शर्मा आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाने आमेर जेतपुवाला (राष्ट्रीय सरचिटणिस राष्ट्रवादी युवक काँग्रेस) यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस,समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोकदल उमेदवारांच्या प्रचाराकरिता उत्तर प्रदेश येथे दाखल झाले असून बुलंदशहर उत्तर प्रदेश मधून ते उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून उत्तर प्रदेश येथे हजर झाले आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोकदल व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र निवडणूक लढवीत आहेत. या आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता एजाज चौधरी देखील उत्तर प्रदेश मध्ये दाखल झाले असून त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रवादी समाजवादी व राष्ट्रीय लोक दल पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण प्रामाणिकपणे या निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहोत. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोकदल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार के.के शर्मा यांच्या प्रचाराकरिता आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. त्यांनी उत्तर प्रदेश मधील मतदारांना आवाहन केले आहे की, आमच्या उमेदवारास जास्तीत जास्त मते देऊन निवडून आणावे, या प्रचारात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासोबतच एजाज चौधरी हे देखील प्रचारात सहभागी झाले आहेत त्याचबरोबर आमिर जेटपूर्वाला (नॅशनल जनरल सेक्रेटरी) मो. मुझम्मिल खान (नॅशनल सेक्रेटरी ) यांनी निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतला आहे.