शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
भोसरी तसेच चऱ्होली व पुणे आळंदी रोड परिसर या परिसरात युवा मित्र सुनील ( अण्णा) काटे व त्यांच्या सौभाग्यवती ज्योती ताई सुनील ( अण्णा ) काटे यांच्या वतीने महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला शिवांजली सखी मंच च्या अध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या सौभाग्यवती सौ पूजा महेश लांडगे या प्रामुख्याने उपस्थित होत्या, या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला एक हजार महिलांनी आपला सहभाग नोंदविला व आनंदाने हा हळदीकुंकू कार्यक्रम साजरा केला, परिसरातील महिलांचे संघटन व या संघटित महिलांचे सक्षमीकरण या उद्देशानेच या भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याचे युवा मित्र सुनील ( अण्णा) काटे व त्यांच्या सौभाग्यवती ज्योतीताई सुनील ( अण्णा) काटे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू सौ पूजा ताई महेश लांडगे यांच्या हस्ते देण्यात आले , महिलांना एकत्रित करणे तसेच एकत्रित महिलांच्या अडचणी जाणून घेणे व त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे या उद्देशाने महिलांचे संघटन करणे व या संघटनात्मक महिलांना सक्षमीकरण करणे हे या हळदीकुंकू कार्यक्रमाचे मुख्य उद्देश असल्याचे यावेळी ज्योतीताई सुनिल (अण्णा) काटे यांनी सांगितले.