शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेच्या पिंपरी विधानसभा संघटिका सौ सरिता अरुण साने यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, सदर कार्यक्रम हा शनिवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते आठ या कालावधीत संपन्न झाला या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात अनेक महिलांनी आपला सहभाग नोंदविला, दरवर्षी सौ सरिता अरुण साने या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व मोठ्या प्रमाणात आयोजित करीत असतात या त्यांच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला अनेक महिलांची उपस्थिती असते त्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक महिलांनी आपला सहभाग नोंदविला हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे निमित्ताने सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक महिला एकत्रित येत असल्याने महिलांचे संघटन मोठ्या प्रमाणात सौ. सरिता साने या करीत असल्याचे या निमित्ताने दिसून आले या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरेख अशी रांगोळी काढण्यात आली होती हि रांगोळी सर्वांचे मन व लक्ष वेधून घेत होती सौ. सरिता साने यांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व महिलांचे आभार व्यक्त केले अनेक महिलांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
यावेळी सौ सरिता साने यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की मागील दोन वर्षापासून कोरोनाविषाणू ने थैमान घातले होते आता परिस्थिती थोडीशी बरी आहे या चांगल्या परिस्थितीत मी या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आणि या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणेच मला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे माझ्या महिला मैत्रिणींना याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात अनेक माझ्या महिला मैत्रिणींनी सहभाग घेऊन आनंद लुटला याचे मला समाधान आहे या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे निमित्ताने दोन छोट्या मुलींनी सुरेख अशी रांगोळी रेखाटली आहे हि रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधत आहे सौभाग्याचं लेणं असतं त्याचप्रमाणे ही रांगोळी रेखाटण्यात आली आहे ही रांगोळी रेखाटणार्या मुली या खूप छोट्या असून इयत्ता आठवीत शिकत आहेत त्यांचे खरेच कौतुक करायला हवे, मी नेहमीच सामाजिक उपक्रम व कार्यक्रम घेत असते व प्रत्येक वेळी मला हजारो महिलांचा पाठिंबा मिळतो या सर्व महिलांना मी धन्यवाद देते मी सर्व उपस्थित महिलांचे आभार व्यक्त करते अशा शब्दात सौ सरिता साने यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
यावेळी मैत्रिणी ग्रुपच्या ॲडमिन सौ प्रतीक्षा तिरची यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की आजचा सौ. सरिता साने यांनी आयोजित केलेला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम हा खूपच छान आहे आणि भारतीय संस्कृती जपण्याचा सौ. सरिता साने यांनी जो प्रयत्न केला आहे तो खूपच स्तुत्य आहे, या निमित्ताने महिला एकत्र येतात सर्व आनंदाने हा कार्यक्रम साजरा करतातसौ. सरिता साने या नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तयार असतात त्यांना समाज कार्याची खूप आवड आहे खरंच हा कार्यक्रम खूप खूप छान आयोजित करण्यात आला आहे .
तसेच या कार्यक्रमात सौ संगीता कदम यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की सौ. सरिता साने या दरवर्षी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात आयोजित करतात व या कार्यक्रमात भरपूर महिलांचा सहभाग असतो व असेच कार्यक्रम सौ. सरिता साने दरवर्षी घेत असतात त्यांना आमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा, त्याचप्रमाणे सौ शैला पाचपुते यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की हळदी कुंक सारखा कार्यक्रम सौ. सरिता साने या नेहमी आयोजित करीत असतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा सौभाग्याचं लेणं आहे आणि या कार्यक्रमात अनेक महिला सहभागी घेऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटत असतात त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो त्यांना भविष्यातील राजकीय वाटचालीस आमच्या शुभेच्छा.
त्याचप्रमाणे सौ सुप्रिया यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की सौ. सरिता साने यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आमची उपस्थिती असते आम्ही कितीही दुसऱ्या कामात व्यस्त असलो तरी सौ. सरिता साने यांच्या कार्यक्रमाला आनंदाने हजेरी लावतो त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला सातशे ते आठशे महिलांचा प्रतिसाद मिळतो या अशा कार्यक्रमामुळे अनेक महिला एकत्रित येतात एकमेकींना भेटतात सौ. सरिता साने यांनी नेहमीच असेच कार्यक्रम घेत राहावे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस माझ्या शुभेच्छा.
तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्या सौ शोभा साने यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की सौ. सरिता साने या नेहमीच सामाजिक कार्यात व्यस्त असतात असे सामाजिक उपक्रम राबवित असतात दरवर्षीप्रमाणे या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमालाही अनेक महिलांचा प्रतिसाद मिळाला सौ. सरिता साने या अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी सामाजिक कार्याला महत्त्व देणे आवश्यक आहे असे या निमित्ताने सौ शोभा साने यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या
या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेतला सर्व महिलांचे सरिता साने यांनी आभार व्यक्त केले.