शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०७ फेब्रुवारी) ;- पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष प्रशांत सपकाळ हे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झाले असून त्यांनी आपल्या प्रभागात नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार तसेच शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग क्र. ३४ येथे प्रशांत सपकाळ यांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती.
याबैठकीत प्रभाग रचना, प्रभागातील विविध सामाजिक प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ध्येय धोरणे अशी अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असून पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाने केलेल्या भ्रष्टाचार याविषयी माहिती प्रशांत सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना दिली. महानगरपालिका निवडणूक संदर्भात संघटनात्मक बांधणीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे हि आवाहन यावेळी प्रशांत सपकाळ यांनी दिले.