शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०७ फेब्रुवारी) ;- पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली दिपक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित चिखली या संस्थेच्या चेअरमनपदी, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष प्रदीप खंडू आहेर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या चिखली दीपक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदावर विराजमान झाल्यानंतर प्रदीप आहेर यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले कि, मला इतर मागासवर्गीय पदामधून विक्रमी मतांनी विजयी केल्याबद्दल समस्त ग्रामस्थ, टाळगाव, चिखली येथील ग्रामस्थांचे मनापासून आभार. तसेच माझ्यावर जो विश्वास दाखविला व मला चेअरमनपदाची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे शतशः आभारी राहीन. तसेच मिळालेल्या जबाबदारी या पदावर मी प्रामाणिकपणे काम करेल व संस्थेचे विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.