शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०८ फेब्रुवारी) :- नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे आणि भाजपा पिं.चिं. शहर उपाध्यक्ष जिल्हा शेखर बबनराव चिंचवडे यांच्या वतीने चिंचवडे फार्म चौक ते बिजलीनगर चौक या रस्त्याच्या दोन्ही सर्व्हिस रस्त्याचे डांबरीकरणाचे कामाला सुरवात करण्यात आली आहे.
नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या वतीने प्रभागातील कामना गती मिळाली आहे. या प्रभागातील नागरिकांना कोणत्याही समस्या उद्धभवू नये म्हणून त्या नेहमी प्रभागातील काम करण्यास तत्पर असतात. नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या माध्यमातून प्रभागातील रेलविहार रस्ता, चिंचवडे नगर स्पाइन रोड तसेच शेवंतीबन कॉलनी च्या बाजूचे सर्व्हिस रस्ते बऱ्याच दिवसापासून डांबरीकरणासाठी प्रलंबित होते. नागरिकांच्या मागणीनुसार यशस्वी पाठपुरावा करून या रस्त्याचे डांबरीकरण काम काल आणि आज या दोन दिवसात पूर्ण करण्यात आले. असल्याची माहिती शेखर चिंचवडे यांनी दिली आहे.