शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०९ फेब्रुवारी) :- कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी भोसरी परिसरातील तरुण तरुणींना विविध क्षेत्रातील नामवंत कंपण्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळवूण देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कविताताई भोंगाळे युवामंच वतीने भव्य ऑनलाईन नोकरी जॉब कार्ड महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये परिसरातील विविध ठिकानामधील Manufacturing, IT, Banking, Finance, Retail, BPO, KPO, Healthcare, Security, Facility, Hospitality, Real Estate, Automobile, Agriculture, Pesticide & Fertilizer, Media ई. क्षेत्रातिल नामवंत कंपन्या मध्ये तरुण- तरुणींना संधी दिली जाणार आहेत. यामध्ये कमीत कमी ५ वी पास ते १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा ई. विविध शिक्षण घेतलेले तरुण – तरूणी सहभागी होऊ शकतात.
या ऑनलाइन जॉब कार्ड रोजगार मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी नियम,अटी व सूचना –
1 .भव्य ऑनलाईन नोकरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करने गरजेचे आहे .
2 .नोंदणी झाल्या नंतर मुलाखती ची वेळ व दिनांक कळविण्यात येईल.
३ .दिलेल्या दिवशी व वेळेतच ऑनलाईन उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
४ .आपले Selection/Shortlist/Rejection सर्वस्वी आपल्या मुलाखती वर अवलंबुन आहे.
५ .आपले Selection/Shortlist/Rejection चे सर्व अधिकार मुलाखत घेणाऱ्या कंपनीचे असतील.
६ . ज़्या लोक़ांचे Selection होईल अश्या लोकांनी सांगितलेल्या दिवशी कामावर हजर राहणे गरजेचे आहे.
खालील लिंक open करून फॉर्म भरणे, https://cutt.ly/RINTCqi तसेच अधिक माहितीसाठी ९९२२०८६२०० / ९३५९५७२०८८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सौ.कविता भोंगाळे युवामंच वतीने करण्यात आले आहे.