आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत अपघाती विमा संरक्षण
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१० फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघातील आमदार तथा माजी भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचा वाढदिवस येत्या १५ फेब्रुवारी रोजी विविध उपक्रमांनी शहरात साजरा होत आहे. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन व प्रसन्न मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट विद्यमाने तसेच रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक २६ मधील चिंचवडे नगर, शिवनगरी, बिजलीनगर, दळवीनगर या परिसरातील प्रत्येक कुटुंब प्रमुखांसाठी मोफत अपघाती विमा संरक्षण हा दोन लाख ५० हजार रुपयांचा विमा मोफत दिला जाणार आहे.
जनसेवेसाठी अविरत सेवा संस्कृती अथक प्रयास हा आमचा संस्कार. असे म्हणत शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन आता प्रत्येक कुटुंबाचा आधार यानिमित्ताने होणार आहे. नगरसेविका करुणा चिंचवडे व भाजप शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक २६ मधील सामान्य कुटुंबातील कुटुंबप्रमुख पुरुषांसाठी ही खास योजना असेल. यासाठी आवश्यक कागदपत्रे पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड तसेच वयोमर्यादा १८ ते ५० असायला हवी, विमाधारकाने दिलेल्या फॉर्ममधील माहिती भरून देणे आवश्यक आहे. या साठी नाव नोंदणी फॉर्म मिळविण्यासाठी शेखर चिंचवडे जनसंपर्क कार्यालय वृंदावन कॉलनी, वाल्हेकर वाडी रोड, चिंचवडे नगर तसेच शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन दगडोबा चौक, चिंचवडेनगर व तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी तसेच माने हॉस्पिटल जवळ ,दळवी नगर ब्रिज समोर संपर्क साधण्याचे आवाहन भाजप शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे यांनी केले आहे. तसेच या उपक्रमात सहभागी होऊन जास्तीत जास्त नागरिकांनी या विमा संरक्षण उपक्रमाचा लाभ घ्यावा,असेही आवाहन शेखर चिंचवड यांनी केले आहे.