ओम शांती… आमदार महेश लांडगे यांची उद्योगपती स्व. राहुल बजाज यांना श्रद्धांजली
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी उद्योगपती स्व. राहुल बजाज यांना श्रद्धांजली दिली. भारतातील प्रसिध्द उद्योगपती आणि बजाज समूहाचे अध्यक्ष श्री. राहुल बजाज यांचे शनिवारी निधन झाले. हे वृत्त पिंपरी-चिंचवडकरांसाठी वेदनादायी आहे. भारताच्या उद्योग क्षेत्रातील राहुलजी यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे.
विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडला ‘ऑटो हब’बनवण्यात बजाज समुहाचा मोलाचा वाटा आहे. बजाज यांच्या जाण्याने ‘उद्योगनगरी’चे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. शहराची वाटचाल आता स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. त्याच्या पायाभरणीमध्येच खऱ्या अर्थाने बजाज समुहाचा हातभार आहे. आज शहरातील हजारो कामगारांना रोजगार मिळाले आणि शहराला कामगारनगरी अशी ओळख प्राप्त झाली. त्यामुळे आम्हा पिंपरी-चिंचवडकरांचे वर्तुळ बजाजशिवाय पूर्ण होवू शकत नाही. राहुलजी बजाज यांच्या जाण्याने न भरुन येणारी हानी झाली आहे.