शबनम न्यूज : पुणे (दि.१३ फेब्रुवारी) :- बॉम्बे सेंट्रल येथील वायएमसीए इंटरनॅशनल ट्रेनिंग हॉल मध्ये महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या आठव्या वर्धापन दिन सोहळ्यात महाराष्ट्रातून आलेल्या २२ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत हा सन्मानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कोरोना काळात मानवतेसाठी ज्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता रस्त्यावर उतरून काम केले, गरजवंताची गरज आणि भूकेल्यांची भूक भागवली अशा सर्व शुरविरांना *”कार्य अभिमान पुरस्कार”* देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी पुण्यातील पाच विशेष लोकांची निवड करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या माजी उपाध्यक्षा मा.श्रीमती जॅनेट डिसुझा मॅडम आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अनिल भोसले साहेब यांच्या हस्ते पा.बन्यामीन काळे, पा.सॅमसन चोपडे, मा.डेव्हिड काळे, मा.नितीन गायकवाड, सि.वनिता पिल्ले यांना *”कार्य अभिमान पुरस्कार”* प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी आमदार राजीव आवळे, प्रोफेसर राम पूनियानी, साहित्यिक व संशोधनकार विश्वास वळवी, वारपथ चित्रपटाचे निर्माते डॉ.दिलीप वाघ, कृपा फाउंडेशनचे डॉ.जेम्स तिवडे, मराठी चित्रपट निर्माते नथानीयल शेलार, सेंट झेविअर कॉलेजचे प्राचार्य फादर फ्रेजर मास्कारेन्स, ज्येष्ठ पत्रकार सॉलोमन गायकवाड, ॲड.सिरील दारा, डॉ.प्रफुल्ल असुर्लेकर, ब्र.डॅरिल डिसूझा, रेव्ह.डॉ.एम.डी. बोर्डे तसेच राज्यातील काही पदाधिकारी आणि राजकीय मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन सि.फ्रॅक्लिन वर्गीस यांनी केले. तर ब्र.डॅरिल डिसूझा यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले यावेळी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी वर्धापन दिनास शुभेच्छा ऑनलाईन दिल्या, तर डॉ.असुर्लेकर यांनी ना.थोरात यांच्या आरोग्यासाठी तसेच सध्याची परिस्थिती सुरळीत होऊन सर्वसामान्यांचे जीवन पुन्हा एकदा उभे राहावे यासाठी प्रार्थना केली. या समयी “सत्य” नाताळ विशेषांकाचे संपादक ब्र.डेव्हिड काळे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना “सत्य” नाताळ विशेषांक भेट दिला. तसेच प्रसिद्ध इतिहासकार आणि साहित्यिक विश्वास वळवी यांचे “इतिहास म्हणजे काय ?” या पुस्तकाचे प्रकाशन विधान परिषद सदस्य मा.सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.