शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१३ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते, माजी महापौर आझमभाई पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला यांच्या वतीने गरीब कुटुंबातील व्यक्तींना अन्नदान वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम पिंपरी येथे सावली प्रतिष्ठान या संस्थेत संपन्न झाला.
यावेळी एकूण दीडशे गरजू निराधार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. अकबर मुल्ला यांच्या वतीने असे अनेक सामाजिक उपक्रम नेहमीच राबविले जातात. राष्ट्रवादीच्या माध्यमातून अकबर मुल्ला यांनी अनेक गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचे यावेळी राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी कौतुक केले.
सदर कार्यक्रमास पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याच बरोबर माजी उपमहापौर मोहम्मद भाई पानसरे, फजल भाई शेख, आजम मोहम्मद पानसरे, माजी नगरसेवक संदीप चिंचवडे, शकरुल्ला पठाण, विशाल चंपावत, सोमनाथ उकिरडे, इक्बाल शेख, मारुती सोनटक्के आदी अकबर मुल्ला यांचे मित्र व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांचे अकबर मुल्ला यांनी आभार व्यक्त केले.