शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१५ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील पिके चौक ते यशदा चौक एचसीएमटीआर मधील जागेत बीएमएक्स पार्क प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या नियोजित प्रकल्पाची मा. विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
या प्रकल्पाचे वैशिट्य म्हणजे पार्क ४६३ लांब व ३० मीटर रुंद असणार आहे. Bicycle motocross हा प्रकार adventure sports मध्ये मोडतो .Adventure sports खेळणाऱ्या नवीन खेळाडूसाठी रेसर्स व कमी उंचीच्या जंपसह बीएमएक्स ट्रॅक नियोजित आहे. बीएमएक्स बाईक ऑफ रोड रेसिंग साठी असते हा पंप ट्रॅक लाल माती, डांबर अथवा बिटूमेनपासून बनवली जातो. एका ट्रॅक मुळे एका वेळी जास्तीत जास्त ८ खेळाडू हा ट्रॅक वापरू शकतात. ट्रॅक मध्ये सुरवातीच्या पॉइंट पासून समाप्त लाइन पर्यंत विविध जंप आणि रोलर्स असतात. या पार्क मध्ये पीके चौकातून प्रवेश असेल तसेच यामध्ये पालकांसाठी बैठक व्यवस्था असेल. तसेच रेसिंग ट्रॅक साठी व्ह्यूइंग् गॅलरी ,कॅफेटेरिया,सेल्फी पॉईंट व पार्किंग व्यवस्था असणार आहे.
रनिंग ,स्केटिंग ट्रॅक असेल व या खेळा संबंधी माहिती व शिकविण्यासाठी ट्रेनर असेल. अशा या नाविन्यापूर्ण व सोयी सुविधा युक्त प्रकल्पाची विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली. यावेळी स्मार्ट सिटी जनरल मॅनेजरअशोक भालकर ,कार्यकारी अभियंता मनोज सेठिया ,आर्कीटेक्ट श्रुती शहा शिर्के कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर विजय बांदल ,तानाजी चव्हाण,अनिकेत धायगुडे आदी उपस्थित होते.