शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१५ फेब्रुवारी) :- मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा उद्या (बुधवारी) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, माजी मंत्री सचिन अहिर, सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात बुधवारी (दि.16) सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. याबाबतची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे, उपाध्यक्ष रवी नामदे, सचिव बशीर सुतार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. खासदार श्रीरंग बारणे यांचा बुधवारी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागील चार दिवसांपासून विविध कार्यक्रम होत आहेत. रोजगार मेळावा, भव्य आरोग्य शिबिर पार पडले.