भोसरी रूग्णालयाच्या अधीक्षिका व वैद्यकीय अधिकारी लोखंडे मॅडम यांनी बुस्टर डोस करीता केले त्वरीत नियोजन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१५ फेब्रुवारी) :- कोरोना कालावधीत फ्रंटलाईन वर्कर म्हणून शिक्षकांना विशेष प्राधान्याने लसीकरण करण्यात आले होते. आता प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या असून शिक्षक विद्यार्थी असा डायरेक्ट संपर्क आता होत आहे . त्या दृष्टिकोनातून दक्षता म्हणून फ्रंटलाईन वर्कर धर्तीवर शिक्षकांना बूस्टर डोस प्राधान्याने दिला जावा यासाठी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी अधीक्षिका व वैद्यकीय अधिकारी लोखंडे मॅडम यांच्याशी संपर्क साधला लेखी पत्र दिले.
लोखंडे मॅडम यांनी त्वरित वरिष्ठांशी संपर्क साधून याबाबत चर्चा केली. भोसरी नविन रुग्णालय तसेच सखुबाई गवळी उद्यान येथे बूस्टर डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती लोखंडे मॅडम यांनी नगरसेविका प्रियांका बारसे यांना दिली. सेकंड डोस घेऊन नऊ महीने पुर्ण असणा-या फ्रन्टलाइन वर्कर शिक्षकांना कोविशिल्ड बुस्टर डोस घेता येईल.
स्वत: व शाळेतील इतर सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन नगरसेविका प्रियांका बारसे यांनी केले आहे. शिक्षकांसाठी वयाची अट नाही. लसिकरणास जाताना शिक्षकांनी फोटो आय डी ,आधारकार्ड न्यावे तसेच एकत्रित कार्यरत शिक्षकांचे मुख्याध्यापक पत्र केंद्रावर जमा करावे.