शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१५ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघातील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव सांगवी परिसरात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने एकता चौक येथे फिनिक्स सेल्फी पॉईंटचे उदघाटन करण्यात आले.
तसेच सांगवी मधील उद्यानामध्ये वॉकिंगला व व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या फिटनेस किटचे वाटप संतोष कांबळे यांच्या तर्फे करण्यात आले.तसेच मधुबन सोसा.येथिल उद्यानात सौ.शारदा सोनवणे यांच्या प्रयत्नातून नागरिकांना करमणुकीसाठी सांऊड सिस्टीम बसविण्यात आले व महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या महापौर निधीतून सांगवी गंगानगर ते आनंद नगर चौक,साई चौक,प्रिर्यदर्शनी नगर छावा चौक येथे नागरीकांना व्यायाम करण्यासाठी ओपन जिम व पीडब्ल्यूडी चौक येथे स्मार्ट बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी महापौर माई ढोरे, मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप , हर्षल ढोरे, संतोष कांबळे,शारदा सोनवणे,(नगरसदस्य),संजय जगताप,दर्शना कुभारकर,दिलीप तनपुरे सर,प्रकाश ढमाले,मधुकर त्रिभुवन,राजेश सावंत,कृष्णा भंडलकर,अरून ढोरे,कदम सर,संजय नायकवडी,धनंजय ढोरे,साहेबराव कांबळे,बोरसे सर,आप्पा ठाकर,हिरेन सोनवणे,प्रकाश पाटील, गणेश काची,गणेश रानवडे,सुरेश शिंदे,खैरे मामा,दत्ता यणपुरे,डॉ.देविदास शेलार,साई कोंढरे,अजय दुधभाते, शरदसर ढोरे,आतुल खोडदे,गणेश बनकर,किरण दहिवाळ,निमेश कांबळे,बागडी,भुषण शिंदे,मंगेश कोर्दे,श्रीधर ढोरे,अक्षय ढोरे,महेश कावळे,विजय मागाडे,मिलिद कातोरे,रवी कोर्दे,शाम मातोळे,बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.