पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आदित्य बिरला एज्युकेशन ट्रस्टच्या मदतीने एम्पॉवर ची स्थापना
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१५ फेब्रुवारी) :- एम्पॉवर या आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट च्या सहाय्याने चालविण्यात येणाऱ्या क्रांतिकारी सामाजिक उपक्रमांतर्गत एम्पॉवर सेंटर पुण्यामध्ये आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल मध्ये ए विंग थर्ड फ्लोअर मध्ये मंगळवारी सुरू करण्यात आले. एम्पॉवरच्या संस्थापिका व अध्यक्ष नीरजा बिर्ला यांनी मंत्री दत्तात्रय भरणे आणि आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलच्या रेखा दुबे यांच्या उपस्थितीत एम्पॉवर सेंटरचे उद्घाटन केले.या उपक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
गेल्या दोन वर्षात पुण्यासह एकूण महाराष्ट्रात मानसिक आरोग्याच्या समस्या आणि त्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. बीएमसी एम्पॉवर १ :१ हेल्पलाईन पडून हाती आलेल्या माहितीनुसार पॉवरच्या असे निदर्शनास आले आहे की, आरोग्य विषयी चिंता, दुःख, व्यसने आणि तानतनाव यांच्याशी संबंधित तब्बल ५० हजार पेक्षा जास्त कॉल्स महाराष्ट्रातून आले. मानसिक आरोग्य समस्यांचे निवारण करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्याकडे लोकांचा कल वाढत असल्याचे यावरून दिसून येते. खास करून पुण्यामध्ये आयटी आणि स्टार्टअप हब म्हणूनही ओळखले जाणारे, या शहरांमध्ये काम व खाजगी जीवनातील असंतुलन एकाच वेळी अनेक कामे करावी लागण्याची ओझे आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा यामुळे मानसिक चिंता सहन करावे लागणारे लोक अनेक आहेत. ज्यामुळे सर्वांगीण मानसिक आरोग्य सेवा केंद्राची गरज वाढत आहे. समाजात निर्माण होत असलेली ही गरज पूर्ण करण्याचे काम पुण्यातील एम्पॉवर सेंटर करेल. एम्पॉवर सेंटर सुरू झाल्यामुळे पुणे व आजूबाजूच्या भागांतील रहिवाशांना दर्जेदार मानसिक आरोग्य देखभाल सेवा पुरवल्या जाऊ शकतील.
दीर्घकाळापासून सुरू असलेल्या महामारी मुळे मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व जाणवून दिले असून सर्वांगीण आरोग्य देखभाल व्यवस्थापनासह मानसिक आरोग्य सेवा देखील गरजेचे असल्याचे या मुद्द्याकडे सध्याच्या सरकारचे लक्ष वेधले आहे. पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या एम्पॉवर सेंटरमध्ये मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ञ, स्पीच, थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, लहान मुले व वयस्कर व्यक्तींची मानसोपचार,तज्ञ यांची संपूर्ण टीम उपलब्ध असून सुरक्षित व सहाय्यक वातावरणात समुपदेशन थेरपी व उपचार पुरविले जातील हे एम्पायर सेंटर पाच हजार चौरस फुटांचे असून याठिकाणी आठ कन्सल्टिंग रूम आणि तेरा थेरपी रुम्स आहेत. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आराम वाटावा असे आश्वासक वातावरण राखले गेले आहेत. तसेच रुग्णांची संपूर्ण माहिती पूर्णपणे गोपनीय राखण्याची नीट काळजी देखील या ठिकाणी घेतली जाते.
पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एम्पॉवर सेंटरचे उद्घाटन प्रसंगी संस्थापिका व अध्यक्षांनी नीरजा बिर्ला यांनी सांगितले की, मानसिक आरोग्य सारख्या भारतातील आरोग्य सेवा क्षेत्राशी संबंधित एका अतिशय महत्त्वाच्या पण दुर्लक्षिल्या जाणाऱ्या मुद्द्यांमध्ये ते स्वतः लक्ष घालत आहेत आज भारतात १४ टक्के गुण जास्त व्यक्ती काहीना काही मानसिक आरोग्य समस्यांनी त्रस्त आहेत. यांची एकूण आकडेवारी जवळपास वीस कोटी इतकी जास्त आहे. महामारी मुळे या समस्येने अधिक जास्त गंभीर रूप धारण केले आहे. लॉक डाऊन च्या पहिल्या महिन्यातच मानसिक आरोग्य समस्यांनी त्रस्त व्यक्तींची संख्या २० टक्क्यांनी वाढली असेल मानसिक आरोग्याची समस्या असलेल्यांपैकी ८० टक्के लोकांना वर्षभर काहीच उपचार मिळत नाही रुग्ण आणि उपचारांमध्ये नंतर ८३ टक्के इतकी जास्त आहे. एम्पॉवर मध्ये आमचे प्राथमिक व सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्य समस्यांविषयी बोलते करण्यासाठी आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी त्यांनी तज्ञांची मदत घेण्यात येऊ नये यासाठी प्रोत्साहन देणे हे आहे. जास्तीत जास्त लोकांना सर्वसमावेशक मानसिक आरोग्य देखभाल सेवांचा लाभ मिळावा मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचे निवारण करून घेऊन सुखी व कार्यक्षम जीवन जगता यावे यावर एम्पॉवर चे या पुणे सेंटरचा बर असणार आहे
आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे या वेळी उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले की, आदित्य बिरला मेमोरियल हॉस्पिटल मध्ये आम्ही परिपूर्ण आरोग्य देखभाल सेवा सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सुरुवातीपासून आम्ही शारीरिक उपचारांवर सर्वात जास्त भर दिला आहे. रुग्णांवर उपचार करत असताना आम्ही पाहत आहोत की, त्यांना बऱ्याच संघर्षांना सामोरे जावे लागत असते आणि त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. हॉस्पिटलमध्ये एम्पॉवर सेंटर सुरू करण्यात आल्यामुळे आम्ही आमच्या रुग्णांना सर्वसमावेशक मानसिक आरोग्य देखभाल पुरवू शकू.
पुणे सेंटर सुरू करण्यात आल्याचे निमित्ताने एम्पॉवर ने एम्पॉवरमेंट हेल्प फोर सर्वे देखील सुरू केला आहे. हा ऑनलाइन सर्वे असून यासाठी फक्त पाच मिनिटे वेळ लागतो. व्यक्तीला स्वतःच्या दिलेल्या उत्तरांच्या आधारे स्वतःच्या मानसिक आरोग्य विषयी मूलभूत समज मिळावी. हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. यातील प्रश्न दैनंदिन जीवन वागणुकीच्या पद्धती, एकंदरीत जीवन शैली सवयी इत्यादींशी संबंधित आहेत. हे सर्व प्रश्न तज्ञांनी तयार केले आहेत. लोकांना मानसिक आरोग्याविषयी मूलभूत माहिती मिळावी, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावीत आणि गरज निर्माण झाल्यास लोकांना तज्ञांची मदत घेता यावी, या दृष्टीने या सर्वेची रचना करण्यात आली आहे. सर्वेसाठी कृपया पुढील लिंक वर क्लिक करावे-
एम्पॉवर ची सुरुवात २०१६ साली करण्यात आली तेव्हापासून आजतागायत मुंबई कोलकत्ता आणि बंगलोर या ठिकाणी एम्पॉवर सेंटर सुरू करण्यात आली आहे. मुंबईमध्ये एम्पॉवर फाउंडेशन आणि बिट्स पिलानी, बिट्स-गोवा, हैदराबाद व कल्याण मधील बिर्ला कॉलेजमध्ये पॉवर सेल्स कार्यरत आहेत. अशा प्रकारे संपूर्ण देशभरात एम्पॉवर आपला कार्यविस्तार करत आहे. याखेरीज प्रोजेक्ट सक्षम, प्रोजेक्ट संवेदना, प्रोजेक्ट उर्जा, प्रोजेक्ट मन या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आणि दुःख व शोक प्रसंगी मदत करणारा समुह मार्फत देखील एम्पॉवर समाजातील विविध वयोगटातील व विविध स्तरांतील लोकांपर्यंत जाऊन पोहोचले आहे.