शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ फेब्रुवारी) :- मंगळवारी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या स्व-खर्चाने व उद्योजक वसंत काटे,उद्योजक राजू जैन,उद्योजक राजाभाऊ मासुळकर,टेबल टेनिस खेळाडू जेष्ठ मार्गदर्शक नांगरे काका यांच्या शुभहस्ते आणि इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन लेवल २ कोच श्री.चंदर थवानी सर (रायजिंग स्टार्स स्पोर्ट्स क्लब आणि पिंपरी चिंचवड टेबल टेनिस असोसिएशन सचिव ) यांच्या सहकार्याने पिंपळे सौदागर येथील PK चौकातील शिवछत्रपती लिनीअर अर्बन गार्डन याठिकाणी टेबल टेनिस या खेळाच्या नियोजित दोन नवीन टेबल टेनिस कोर्ट पैकी एका टेबल टेनिस कोर्टचे लोकार्पण करण्यात आले.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या प्रेरणेने पिंपरी चिंचवड शहरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील गार्डनमधील पहिला “आउट डोअर टेबल टेनिस कोर्ट” पिंपळे सौदागरमध्ये विकसित करण्यात आला आहे. हा टेबल टेनिस SMC मटेरियल (शीट मोल्डिंग कंपाऊंड ) पासून बनलेले असल्यामुळे तिन्ही ऋतुमध्ये कार्य करेल . या टेबलची लांबी २. ७४ मी लांब , १. ५२५ मी रुंद आणि ७६ सेंमी उंच आहे. या ठिकाणी प्रभागातील रहिवासी विनाशुल्क टेबले टेनिस खेळु शकतात त्याकरिता स्वतःचे रॅकेट आणि चेंडू आणणे आवश्यक आहे.
टेबल टेनिस हा एक सर्वोत्तम खेळ असुन तसा हा खेळ एक इंडोर गेम आहे परंतु आपल्या परिसरातील रहिवासी विशेषतः लहान मुलांमध्ये टेबल टेनिस खेळाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच भविष्यात या खेळामधून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले पाहिजे यासाठी एक नवा प्रयोग म्हणजे “आउट डोअर टेबल टेनिस कोर्ट” विकसित करण्यात आले आहे .महिला व जेष्ठनागरीक सुद्धा एक करमणूक म्हणून टेबल टेनिस खेळाचा आनंद घेऊ शकतात. यामुळे फोकस , एकाग्रता, शारीरिक तंदुरुस्त आणि सक्रियता यामध्ये सुधारणा होते. बागेत आउटडोअर टेबल टेनिस हे कोणत्याही वयोगटातील सामान्य लोकांना टेबल टेनिस खेळण्याचा आनंद आणि मजा घेता येईल. नागरिकांचे आरोग्य व स्वास्थ्य उत्तम टिकवण्यासाठी भविष्यात मैदानी खेळासोबतच इंडोर गेम्स किंवा अशे नवनवीन प्रयोग विकसित करण्यावर नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपले लक्ष्य केंद्रित केले आहे.