शबनम न्यूज ( पिंपरी चिंचवड )
पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी परिसरातील भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी कालच आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला प्रभागातील विकासकामे करण्यास वरिष्ठांच्या मुळे अडचण येत असल्याने आपण नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे कारण यावेळी नगरसेवक वसंत बोराटे यांनी दिले . वसंत बोराटे हे भाजप आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे समर्थक मानले जातात काल आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज सकाळी नगरसेवक वसंत बोराटे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे यावेळी त्यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे , महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, कार्य अध्यक्ष, नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल,उपस्थित होते.
Advertisement