शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ फेब्रुवारी) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बहुचर्चित घरकुल सोसायटीमधील पाच इमारतींमध्ये उभारण्यात आलेल्या सोलर ऊर्जा प्रकल्पाचे आज पुजन करून शुभारंभ करण्यात आला.
राष्ट्रवादी काॅग्रेसचे युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे,नगरसेवक संजय नेवाळे, युवक कार्याध्यक्ष निलेश निकाळजे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोलर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे शिल्पकार येथील रहिवाशी व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अशोक मगर यांच्या माध्यमातून व औद्योगिक कंपन्यांच्या सीएसआर फंडमधून सहकार्याने घरकुलची वाटचाल सोलर सिटीच्या दिशेने सुरू झाली आहे.
यापूर्वी पाच इमारतींमध्ये २०२० साली सोलर प्लान्ट उभारण्यात आला होता.आज आणखी पाच इमारतींमध्ये सोलर प्रकल्प कार्यान्वित झाल्याने आता येत्या वर्षभरात घरकुलमधील सर्व इमारतींमध्ये सोलर ऊर्जा बसविल्यानंतर घरकुल परिसर सोलर सिटी म्हणून ओळखली जाईल.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी अशोक मगर यांच्या कामगिरीचे कौतूक करून “शून्य वीज बिल नगरी म्हणून आगामी काळात घरकुलची इतिहासात नोंद होईल”असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला सचिन औटी,प्रशांत जाधव,युवराज पवार,आबासाहेब गवळी,तुषार सोनवणे,सुरेश सांडुर,युवराज नीलवर्ण,ऋषिकेश जाधव,भगवान पारे,संतोष माळी,अनिल भोसले,गोविंद तांबवडे यांच्यासह सर्व घरकुलवासिय उपस्थित होते.