मेट्रो सिटी वृत्तांत | पिंपरी-चिंचवड
“आपल्या अभिव्यक्तीतून रसिकांना आनंद देणारे आणि दातृत्वाने समाजाशी समरस होणारे पु.ल.देशपांडे हे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर यांनी विरंगुळा केंद्र, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२२ रोजी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित विशेष कार्यक्रमात ‘अष्टपैलू पुलं’ या विषयावर प्रदीप गांधलीकर यांनी सविस्तरपणे पु.ल.देशपांडे यांचा जीवनपट मांडला. अध्यक्षस्थानी माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका अपर्णा डोके होत्या.
तसेच नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, राजाराम गावडे, उषा गर्भे, जयमाला विभूते, चंद्रकांत पारखी, सुदाम गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी या महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अध्यक्ष रमेश इनामदार यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत कोष्टी यांनी स्वागत केले. अरुण घोलप, मंगला दळवी, सतीश कुलकर्णी, सुधाकर कुलकर्णी, चंद्रप्रभा खोत यांनी संयोजन केले. नंदकुमार मुरडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अरविंद जोशी यांनी आभार मानले. यावेळी कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरक्षानियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली होती. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.