मेट्रो सिटी वृत्तांत | पिंपरी-चिंचवड
दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी येथील महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगार वर्गाचे ठेकेदार बदलल्याने सर्व स्वच्छता कामगार वर्गातील महिलांना कामावरून काढून नवीन भरती करण्यात येत असल्याची बाब शिवसेना पक्षाच्या भारतीय कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सुषमाताई अजित शेलार यांच्या निदर्शनास आली असता, त्यांनी महानगरपालिका ह प्रभाग मधील वरिष्ठ अधिकारी थोरात सर यांच्याशी सर्व महिलांच्या सोबत भेट देऊन ठेकेदार जरी बदलला तरी स्वच्छता महिला कामगार तेच ठेवावेत, असे मागणीचे निवेदन दिले. तसेच अन्यथा महिलांना कामावरून काढल्यास संतप्त स्वच्छता महिला कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सुषमा शेलार यांनी यावेळी दिला.
तसेच त्यांच्या या मागणीची दखल घेत महानगरपालिका ह प्रभाग मधील वरिष्ठ अधिकारी थोरात सर यांनी जुन्या महिलांना कामावरून काढू देणार नाही, महानगरपालिकेच्या नवीन बजेट नुसार महिला कामावरुन कमी करायची वेळ आली असता, अशा परिस्थितीत ही स्वच्छता कामगार वर्गातील महिलांना आम्ही दुसऱ्या ठिकाणी कामासाठी पाठवू पण कोणालाही कामावरून काढणार नाही, असे आश्वासन दिले. तसेच सुषमा शेलार यांच्या पुढाकाराने सर्व स्वच्छता कामगार वर्गातील महिलांना दिलासा भेटला व सर्व महिलांनी सुषमा शेलार यांचे आभार मानले.