शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२२ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यांचा हा वाढदिवस सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा होत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेवक संतोष कांबळे यांच्या वतीने त्यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी ‘हास्यकल्लोळ’ हा विनोदी कार्यक्रम हसून हसून लोटपोट करणारी मनोरंजनात्मक कार्यक्रम २३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या हास्यमय कार्यक्रमाचा आनंद लुटावा, असे आवाहन नगरसेवक संतोष कांबळे यांनी केले आहे.
सदर कार्यक्रम श्री.शंकरशेठ जगताप यांच्या संकल्पनेतून आणि आपले कार्यक्षम नगरसेवक संतोष कांबळे यांच्यातर्फे सर्वांसाठी.. हास्यकल्लोळ.. हा लोकप्रिय कार्यक्रम दिनांक २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.
नागरिकांना, महिला भगिनींना व बालकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना पोट धरून हसवण्यासाठी, एक मस्त विरंगुळा अनुभवण्यासाठी हि खास मेजवानी घेऊन हास्यजत्रेतील आपले आवडते कलाकार यानिमित्ताने येत आहेत. नागरिकांना आवाहन करताना फक्त तुमच्यासाठी संतोष कांबळे यांच्या कडून आपणा सर्वांना हे सहर्ष निमंत्रण यानिमित्ताने देण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार उपस्थित राहुन आपली कला सादर करणार आहेत. या कलाकारांमध्ये (हास्य जत्रा फेम ) समीर चौघुले , वनिता खरात ,गौरव मोरे, प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव ही आपली कला सादर करून नागरिकांचे मनोरंजन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक संतोष कांबळे यांनी केले आहे.