शबनम न्यूज : तळेगाव दाभाडे (दि.२२ फेब्रुवारी) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजही नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाणेसाठी काही बंधने आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोरोना लसीचे दोन डोस झाले असेल तरच प्रवेश आहे. यासाठी शासनाने नागरीकांना युनिव्हर्सल पास काढण्यास सांगितले आहे. युनिव्हर्सल पास मध्ये व्यक्तीचा फोटो, लसीकरणाचे दोन्ही डोस झालेली माहिती असते. दोन्ही डोस झालेले प्रमाणपत्र सोबत बाळगणे शक्य नसल्याने नागरिकांच्या सोयीसाठी नगरसेवक संतोष भेगडे सदस्य- पुणे महानगर नियोजन समिती (PMRDA) यांच्या वतीने तळेगाव दाभाडे मधील नागरिकांसाठी मोफत युनिव्हर्सल पास (स्मार्ट कार्ड मोहीम) राबविण्यात येत आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक १८ फेब्रुवारी पासून मोफत युनिव्हर्सल पास (स्मार्ट कार्ड) कढून दिले जात आहे. आतापर्यंत 1142 नागरिकांनी युनिव्हर्सल पास काढून याचा फायदा घेतला आहे. अजूनही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद येत आहे. ही योजना १८ फेब्रुवारी २०२२ ते ०५ मार्च २०२२ पर्यंत सुरु राहणार आहे. यासाठी नागरिकांनी श्री. डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था, गणपती चौक, तळेगाव दाभाडे येथे दुपारी १२ ते सायंकाळी ०५ या वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन संतोष भेगडे यांनी केले आहे.