शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ फेब्रुवारी) :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड विधानसभा मा. अध्यक्ष शेखर चंद्रकांत ( आप्पा ) काटे यांच्या वाढदिवसानिमत्त दि. १८ ते २० फेब्रुवारी २०२२ रोजी अग्रेसन भवन,दापोडी येथे भव्य पुणे जिल्हा मानांकन पुरुष महिला – एकेरी व सांघिक गटाच्या कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी गटामध्ये १७०, महिला १६, व संघ २० अशा २६६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता . स्पर्धा ३ दिवस अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शेखर भाऊ काटे युवा मंच व महामुक्ती कॅरम अकॅडमी चे सनी कतनोरिया व त्यांचे सहकारी यांनी आयोजन केले होते .
तसेच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभास आवर्जून उपस्थित राहिलेले माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस , पिंपरी चिंचवड म.न.पा ) सौ. स्वाती (माई)चंद्रकांत काटे विद्यमान नगरसेविका पिंपरी चिंचवड म.न.पा. ( राष्ट्रवादी काँग्रेस ), अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवक पार्टी श्री शेखर चंद्रकांत ( आप्पा ) काटे , राजेंद्र काटे , विलास अण्णा काटे , चंद्रकांत काटे ,ज्येष्ठ नागरिक चैरमान जयवंत मोरे , दत्ताजी गावडे, चंद्रकांत काटे कबडी पट्टू , विवेक शेठ काटे,सुभाष शहा जयसिंग अढाव , चैरमन कांबळे सर, समस्त गणेश नगर व नागरिक,मोरे, सुभाष शाह, संतोष काटे ,अनुप शेठ काटे, रवि भाऊ कांबळे , दिपक भाऊ साळवी, संदेश भाऊ बोरडे , अक्षय भाऊ गायकवाड, सचिन भाऊ गावडे.साई ग्रुप,शाम ग्रुप रोहित काटे, राज स्वामी,अतुल गायकवाड, गुरूदत्त जाधव,मयूर कांबळे,आकाश नाटेकर, निशिकांत मेहत्रे, किशोर पवार, श्रवण काटे, प्रविण कोंधीलिकर,मनीष बोरडे,महेश लोंढे, आकाश पातूले, रवी नाना क्षीरसागर, प्रणव गायकवाड,सनी वाघमारे,विशाल गोपी,जितेंद्र चोव्हाण,राजेश धुंदाळ,निलेश पाटील सलीम शेख, योगेश परदेसी (विश्वविजेता कॅरम), प्रकाश गायकवाड ( येशीयन चॅम्पियन ) , अनिल मुंढे , अभिजीत त्रिपणकर ,कॅरम अशोसिएशन ऑफ पुणे सचिव नंदू सोनवणे , प्रमुख पंच श्री. राम पडगील, श्री संदीप अडागळे व स्पर्धेचे आयोजक श्री सनी कतनोरीया व महामुक्ती कॅरम अकॅडमी , शेखर भाऊ काटे युवा मंच , सागर भाऊ बोरडे प्रतिष्ठान, आदी मान्यवर उपस्थित होते .