शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ फेब्रुवारी) :- राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त इंद्रायणीनगर भोसरी याठिकाणी नगरसेवक संजय वाबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला नगरसेवक संजय वाबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी लक्ष्मण साळवे (आरोग्य निरीक्षक) व सचिन गव्हाणे (आरोग्य मित्र) यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच अशोक मोरे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड (उद्योग-व्यापार विभाग) कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चंद्रकांत रासकर, दत्तात्रय दिवटे, श्रीकृष्ण म्हेत्रे (निवृत्त पोलीस अधिकारी), रामदास जाधव, विजय पिरंगुटे, संदिपान झोंबाडे, भरत खरात, विठ्ठल माने, असगर आजाद, संजय करगळ, आबा रुपनवर, आकाश शिंदे उपस्थित होते.
Advertisement