शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२४ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी आज आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिला.
भाजपच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण हा राजीनामा दिला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.नगरसेवक तुषार कामठे यांनी वेळोवेळी भाजपाच्य मनमानी कारभाराचा निषेध केला आहे तसेच महानगरपालिकेत होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत खुलेपणाने आवाज उठविला त्यांनी केलेल्या तक्रारीवर भाजपाच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले या बाबतीत ते पहिल्यापासूनच नाराज नगरसेवक म्हणूनच वावरत होते.
पिंपरी-चिंचवड शहरात एकापाठोपाठ एक भाजपमधून निवडून आलेले नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत ही भाजपसाठी मोठी डोकेदुखी आगामी निवडणुकीत ठरणार हे निश्चित.
पिंपळे निलख भागातील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार दर्शविणारे फ्लेक्स संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात लावले होते यावरूनच शहरवासियांना तसेच भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागली होती ती लवकरच तुषार कामठे ही नगरसेवक पदाचा राजीनामा देतील व राष्ट्रवादीच्या वाटेवर जातील.
मागील आठवड्यातच भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे तसेच भाजप नगरसेविका चंदा लोखंडे यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून 22 ते 23 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे जर असे झाले तर भारतीय जनता पार्टीला पिंपरी-चिंचवड शहरात निवडणुकीला सामोरं जाताना मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत.