शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२४ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यांचा हा वाढदिवस सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा होत असताना शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेवक संतोष कांबळे यांच्या वतीने त्यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी हास्यकल्लोळ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे (दि. २३) फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले होते.
यावेळी (हास्य जत्रा फेम ) समीर चौघुले , वनिता खरात ,गौरव मोरे, प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव यांनी आपली कला सादर करून नागरिकांचे मनोरंजन केले. तसेच या कार्यक्रमाला आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे प्रमुख उपस्थित होते. यावेळी अश्विनीताई जगताप ,नगरसेविका शारदा ताई सोनवणे, नगरसेवक हर्षल ढोरे , नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेवक सागर अंघोळकर, नगरसेवक शशिकांत कदम, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेविका माधवी राजापूरे, धनंजय ढोरे, अमित पसरणिकर, माऊली जगताप, शंकरशेठ जगताप, आप्पा ठाकर, दत्ता येणपुरे, वनराई चे अध्यक्ष उद्योजक राजू शेठ धारिया,नगरसेवक संतोष कांबळे मिञ परिवार निमिष कांबळे, रविंद्र यादव, राहूल विधाटे, प्रविण कांबळे, विक्रम कदम, सुनिल कांबळे, अमित बराटे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय उलपे यांनी केले.