शबनम न्यूज : आळंदी (दि.२५ फेब्रुवारी) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे संलग्न, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय डुडूळगाव, (आळंदी), जि. पुणे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘आजादी का अमृत महोत्सव, माझी वसुंधरा व माझा गाव कोरोनामुक्त गाव’ अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचा तुळापूर येथे समारोप समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत गाऊन, दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. या समारोप प्रसंगी श्री.आनंद ठोसर, श्री. श्रीनिवास चौरे, श्री. विनोद मांडवगणे आणि श्री. संकेत वरपे इत्यादी स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर राष्ट्रीय सेवा योजना युनिट व डॉ. रणजित कदम व प्रा. संजीव कांबळे यांचा राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून तुळापूरच्या प्रथम नागरिक व सरपंच मा. सौं. ॲड. गुंफा इंगळे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, मा. डॉ.प्रदीप कदम, प्राचार्य- कॉनक्वेस्ट महाविद्यालय,चिखली, यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हा महत्त्वपूर्ण मार्ग असून या मार्गामुळे विद्यार्थी परावलंबी जीवन न जगता स्वावलंबी जीवन कसे जगतो, या संदर्भात अनेक उदाहरणांसह सखोल मार्गदर्शन करीत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास सविस्तर सांगितला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात, यांनी राष्ट्रीय सेवा योजना श्रमदान शिबिरातील स्वतःचा अनुभवांचे विवेचन करून राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाकडे कसा गरुड झेप घेतो. यासंदर्भात मत व्यक्त करून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मा. श्री.जाधव, मुख्याध्यापक – धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय, तुळापूर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील प्रत्येक विद्यार्थी नक्कीच राष्ट्रीय समाजकार्यात मोलाची भूमिका पार पाडून देश सेवेच्या कार्यात ठसा उमटवतील असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना मा. सौ. गुंफा ज्ञानेश्वर इंगळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय स्वच्छतेच्या कामाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना भविष्यकालीन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी मा. प्रा. राजीव पाटील, प्रशासकीय संचालक – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व डॉ. प्रमोद इंगळे, प्राचार्य- ज्ञान विलास कॉलेज ऑफ फार्मसी, यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले, खजिनदार- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रा. कैलास अस्तरकर, प्रा. परमेश्वर बत्ताशे, प्रा. प्रेरणा पाटील,प्रा. निशा सोनवणे, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. शाहूराज येवते व प्रा. विश्वनाथ व्यवहारे, प्रा. प्रविण डोळस यांचेही सहकार्य लाभल
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, राष्ट्रीय सेवा योजनेचा, विद्यार्थी श्री. ज्ञानेश्वर उनावणे याने केले, तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार, श्री. स्वागत चौधरी याने मानले. या कार्यक्रमाचा समारोप, सामुदायिक पसायदानाने झाली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.