शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२५ फेब्रुवारी) :- विस्डम करिअर एज्युकेशन प्रा. लि. कंपनीही विद्यार्थ्यांना परदेशात इंटर्नशिप आणि उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करणारी राज्यातील नामांकित कंपनी आहे. या कंपनीच्या वाकड शाखेचे उद्घाटन समारंभ पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते शनिवारी (दि. २६ फेब्रुवारी) दुपारी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन शेंडगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
विस्डम करिअर एज्युकेशन ही कंपनी २००८ साली स्थापन करण्यात आली. या कंपनीचे मुख्य कार्यालय नवी मुंबई येथे असून परदेशात यूएसए, मलेशिया, फ्रान्स आणि गोवा, नवी मुंबईत, पुण्यात कार्यालये आहेत. कंपनीच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत पाच हजारांहून जास्त विद्यार्थ्यांना देशातील प्रमुख उद्योग, व्यवसायात इंटर्नशीपसाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच यूएसए, कॅनडा, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोपसह जगभरातील अनेक देशांमध्ये बाराशेंहून जास्त विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसा त्या विद्यापीठांशी सांमजस्य करार करण्यात आला आहे.
वाकड येथिल नवीन शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमास सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले, नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन अमित गोरखे, डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेटमेंटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मिलिंद पेशवे, एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य वैभव फंड, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्या आयशा सिद्दीकी आदी उपस्थित राहणार आहेत. विस्डम करिअर एज्युकेशन प्रा. लि. शॉप नं. २०९, येथील सर्व्हे क्र. १६३/३, वाकड, हिंजवडी पुलाजवळ, देहूरोड – कात्रज बायपास, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या जवळ वाकड, पुणे ४११०५७ महाराष्ट्र. फोन नं. ९७२३४३९७००. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन शेंडगे यांनी केले आहे.