शबनम न्यूज : पुणे (दि.२६ फेब्रुवारी) :- मराठी पाट्या आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोर्टाकडून मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना फटकारले आहे. मातृभाषा मराठी आहे तर मराठी पाठ्या का नाही लावायच्या ? कोणालाही कसलाही छोटा मोठा व्यापार करण्याचा अधिकार आहे,पण तुम्हाला मराठी भाषेत पाठ्या लावायचा कमी पण का आहे ? तुम्ही मराठीमध्ये बोर्डलावा आणि इंग्लिशमध्येपण लावा त्याला विरोध नाही पण पहिले मराठीमध्ये लावाना. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यांचं अभिनंदन, असंही त्यांनी सांगितलं. मराठी भाषा भवनाचं गुढीपाडव्याला भूमिपूजन होणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.