शबनम न्यूज : पुणे (दि.२६ फेब्रुवारी) :- भारतातील सर्वात मोठ्या शालेय स्तरावरील खगोलशास्त्रीय वेधशाळा व प्रयोगशाळेचे अनावरण करण्यात आले. पुणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी हेन्केल अॅडेसिव्हज टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया), ग्लोबल मिशन अॅस्ट्रोनॉमी इंडिया आणि लायन्स क्लब्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 यांच्या सहकार्याने ही प्रयोगशाळा महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्था, पुणे येथे स्थापित करण्यात आली आहे.
खगोलशास्त्रीय वेधशाळा आणि प्रयोगशाळेचे उद्घाटन डॉ. नितीन करमलकर ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू) आणि हेंकेल इंडियाचे डॉ. प्रसाद खंडागळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांमध्ये ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. काशिनाथ देवधर (माजी डीआरडीओ), डॉ. जयंत नारळीकर (वरिष्ठ खगोल-भौतिकशास्त्रज्ञ), डॉ. रूपेश ओझा ( खगोल-भौतिकशास्त्रज्ञ, संचालक नासा युएसए) यांचा समावेश होता. याचसोबत लायन हेमंत नाईक ( डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन्स क्लब 3234 डी2) आणि रवींद्र देव (अधक्ष्य एमकेएसएसएस)उपस्थित होते.
खगोलशास्त्रीय वेधशाळा आणि प्रयोगशाळेच्या मदतीने विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, सुपरमून उल्कावर्षाव, ग्रह-तार्यांचे निरीक्षण, लघुग्रहांचे निरीक्षण, ग्रहांची युती, रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण अशा विविध व अन्य उपक्रमांमध्ये सहभागी होता येईल.
महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्था, पुणे येथील खगोलशास्त्रीय वेधशाळा आणि प्रयोगशाळा ही सहावी आहे. ग्लोबल मिशन अॅस्ट्रोनॉमी इन्स्टिट्यूट, इंडिया सोबतच्या या सहकार्याने हे प्रयोजन केले गेले आहे. ज्याने अमेरिका आणि स्पेनमधील संशोधन संस्थांसोबत सामंजस्य करार केला आहे, याचा अर्थ या सर्व शाळांमधील विद्यार्थी नासाच्या लघुग्रह शोध मोहिमेत सामील होतील. विद्यार्थ्यांना जपान, ऑस्ट्रेलिया आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रांसह इतिहासाच्या लघुग्रहांच्या शोधात सहभागी होण्याची संधी दिली जाईल. या प्रयोगशाळांमधून आता दहा हजार विद्यार्थी अवकाश संशोधनाचा अभ्यास करत आहेत.आम्ही ‘ट्रेन द ट्रेनर’ कार्यक्रमाद्वारे पुण्याच्या आसपास 250 हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.
डॉ. प्रसाद खंडागळे, (हेंकेल इंडिया सीएसआर समिती सदस्य) म्हणाले, अॅस्ट्रोनॉमी ऑब्झर्व्हेटरी आणि प्रयोगशाळेच्या माध्यमातून आम्ही मुलांमध्ये आवड निर्माण करू आणि त्यांना शालेय स्तरापासूनच ज्ञान मिळवण्यात मदत करू. याद्वारे, भारतातील भविष्यातील शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञांसाठी एक ब्रिडिंग ग्राउंड तयार केले जाईल, हेंकेल ने यापूर्वी पुणे जिल्ह्यातील जेजुरी, भोर, तळेगाव, ठमढेरे आणि शिरगाव या पाच तालुक्यांमध्ये खगोलशास्त्रीय वेधशाळा स्थापन करण्यास मदत केली आहे.