शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२७ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील नेताजी काशीद (शिवसेना उपशहर प्रमुख, भोसरी विधानसभा) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. सदर जनसंपर्क कार्यालय मोरेवस्ती चिखली येथे असून नेताजी काशीद या आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या विविध अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत.
प्रभागातील नागरिकांना महानगरपालिका वतीने मिळणाऱ्या योजनांची माहिती मिळावी, तसेच मूलभूत सुविधा नागरिकांना योग्य प्रकारे मिळाव्यात, नागरिकांनी आपल्या अडीअडचणी या जनसंपर्क कार्यलयात नोंदवाव्यात याकरिता नेताजी काशीद यांनी आपल्या जनसंपर्क सुरू केले असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नेताजी काशीद यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यलयावतीने नागरिकांना अनेक सोयी सुविधा मिळणार आहेत. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रवींद्र मिर्लेकर, केसरीनाथ पाटील, वैशालीताई सूर्यवंशी, शहर प्रमुख, नगरसेवक सचिन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.