शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ फेब्रुवारी) :- चऱ्होलीतील काळे कॉलनीतील किड्स पँराडाईस शाळेमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले ,विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे वेगवेगळे चमत्कृतीपूर्ण प्रयोग करून दाखवले. त्याच पद्धतीने प्रत्येक प्रयोग सर्व पालकांना स्पष्टीकरण करून समजावून सांगितले. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक वृंद ,शाळेचे कर्मचारी ,पालक वर्ग सर्वांनी विज्ञानाच्या वेगवेगळे चमत्कारांचा, प्रयोगांचा, माहितीचा अनुभव घेतला. या विज्ञान प्रदर्शनाला सर्व पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
यावेळी वायरलेस पावर ट्रान्सफार्मर, उत्कर्ष तावडे सोलर एनर्जी साईराज धायरेकर यांनी तयार केली याबरोबरच वैष्णवी काळे, विराज ताजने यांनी ही आपले प्रयोग सादर केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे अध्यक्ष व कवी अँड. अनंत काळे सर,यांनी मुलांची सादर केलेल्या प्रयोगाचे भरभरून कौतुक केले, सर्वतोपरीने त्यांना मदत करून त्यांच्या कला गुणांना वाव दिला जाईल व गरीब विद्यार्थ्यांना साहय केले जाईल असे सांगितले.
नगरपरिषदेचे नगरसेवक तसेच शाळेचे खजिनदार अँड. सचिन काळे सर,यांनी सांगितले की यापुढे जीथे जिथे विज्ञान प्रदर्शन असेल त्या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून मुलांना पाठवले जाईल व त्याच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना आवश्यक ते साहित्य पुरविले जाईल .
अण्णा जोगदंड म्हणाले की,आपल्या देशात संशोधकांची संख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून भारत सरकार प्रयत्न करते, इन्स्पाय अवॉर्ड योजना शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे हूशार मुलाचे.टँलेंट ओळखुन त्यांना मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी शाळेचे अध्यक्ष अँड अनंत काळे,खजिनदार, नगरसेवक अँड सचिन काळे,संचालक नवनाथ काळे विज्ञान शिक्षक ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती काळे मॅडम ,अण्णा जोगदंड विज्ञान शिक्षिका ज्योती ढवळे,या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शन संपन्न झाले.