शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ फेब्रुवारी) :- ऑल इंडिया प्रोफेशनल कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने रहाटणी येथिल विमल गार्डन येथे रविवारी (दि. २७ फेब्रुवारी) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा सायली नढे यांच्या हस्ते करण्यात आले. समारोप प्रसंगी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि छत्री व ससून रुग्णालयातील रक्तपेढीतील कर्मचा-यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक विश्वास गजरमल, युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, हिराचंद जाधव, डॉ. मनिषा गरुड, सौरभ शिंदे, निर्मला खैरे, आबा खराडे, विश्वनाथ जगताप, विजय ओव्हाळ, स्वाती शिंदे, अरुण बर्डे, डॉ. अंबिका, प्रियांका कदम, सुप्रिया मलशेट्टी, आशा भोसले, रचना गायकवाड, सोनू दमवाणी, मिलींद गावंडी, अविनाश माने, एस.एन.प्रदिप, एकनाथ नामदे, दिलीप पुरोहित, हनुमंत चव्हाण आदींसह युवा व महिला कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संकलीत झालेल्या रक्ताच्या १०५ बाटल्या ससून सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढीस देण्यात आल्या.