शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ फेब्रुवारी) :- सेवानिवृत्ती हा प्रत्येक कर्मचा-र्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असून सेवानिवृत्तीनंतरचा तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंददायक आणि आरोग्यदायी जावो अशा शब्दात भावना व्यक्त करून महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सेवानिवृत्तांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे फेब्रुवारी २०२२ अखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त होणा-या कर्मचा-यांचा सत्कार महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
सेवानिवृत्ती कार्यक्रमास माजी उपमहापौर केशव घोळवे, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते. माहे फेब्रुवारी २०२२ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांमध्ये सहशहर अभियंता प्रविण लडकत, मुख्याध्यापक संध्या गवळी, अनिता बगाटे, मंगल काळे, उपअभियंता स्थापत्य भाऊसाहेब साबळे, सहाय्यक शिक्षक पंढरीनाथ जरांडे, क्रिडा शिक्षक देवेंद्र घोडके, गटनिर्देशक सुनिल मोरे, उपशिक्षक माधुरी जाधव, छाया गायकवाड, वाहनचालक बस्सीर तांबोळी, रखवालदार अंकुश पवार, मजूर दीपक गागडे, सफाई सेवक कमलेश ककरोठी,
गटरकुली प्रकाश कांबळे यांचा समावेश आहे. तर स्वेच्छानिवृत्त घेतलेल्या कर्मचा-या॑मध्ये कार्यालयीन अधिक्षक साहेबराव साळुंके, मुकादम रविंद्र गायकवाड, शिपाई अजित शितोळे, स्प्रे कुली लक्ष्मण राऊत, सफाई कामगार मिलिंद गायकवाड, सफाई सेवक गोपाल घारू, कचरा कुली सुरेश जगताप यांचा समावेश आहे. महापौर माई ढोरे म्हणाल्या, सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचा-यांची कार्यपद्धती आणि कामाविषयीची निष्ठा प्रशंसनीय आहे. त्यांचा अनुभव महानगरपालिकेतील कार्यरत कर्मचा-यांना मार्गदर्शक ठरेल असेही त्या म्हणाल्या.