शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ फेब्रुवारी) :- भोसरीतील ज्येष्ठ शिवसैनिक व नवनिर्वाचित युवासेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा दरम्यान भोसरी विधानसभेतील समिक्षा जागते,पौर्णिमा मरोठीया, स्वाती आरोडे, रक्षा यादव या युवतींचा पक्षप्रवेश झाला.
भोसरी विधानसभा मतदार संघातील ज्येष्ठ शिवसैनिक व नवनिर्वाचित युवासेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यास शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर यांनी मार्गदर्शन केले.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेनाप्रमुख, राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन अतिशय दिमाखदार पद्धतीने काम करीत असून राज्याच्या योजना तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम शिवसैनिकांनी पार पाडावे. आपल्या प्रभागात जनतेचे मूलभूत प्रश्न व समस्या कसोशीने सोडवाव्यात. आगामी निवडणुकांना सामोरे जाताना आपापल्या प्रभागात लोकहिताची विकासकामे तसेच राज्य सरकारने अल्पावधीत मार्गी लावलेल्या योजनांबाबत शिवसेना, युवासेना,युवतीसेना व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी जनजागृती करावी असे आवाहन यावेळी केले.
कार्यक्रमप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक व नवनिर्वाचित युवासेना पदाधिकाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मा.खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील,महिलासंपर्क प्रमुख वैशाली सुर्यवंशी,जिल्हासंघटिका सुलभा उबाळे, संपर्कप्रमुख कामगार नेते इरफानभाई सय्यद, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे,उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा युवासेनाप्रनुख अजिंक्य उबाळे ,अल्पसंख्याक सेलचे मुनाफ तारसगर, युवतीसेनेच्या प्रतिक्षा घुले उपस्थित होत्या.